Sunday, January 15, 2006

कचेरी !

तुमची कचेरी कशी आहे? "अशी" आहे का?

(चाल : "मनाचे श्लोक", "अकेले अकेले कहां जा रहे हो" किंवा "प्रिया आज माझी नसे साथ द्याया"1)



कचेरी

अरे कर्मचाऱ्या तुझी ही कचेरी,
इथे फक्त मॅनेजराची मुजोरी

न मॅनेजराचा कधी वेळ जातो
मिटिंगा मिटिंगा सदा खेळ2 होतो

पगारात देऊ नये वाढ कोणा
अखेरीस अप्रेज़लाचा बहाणा

हुशारी दुज्यांची परी नाव याचे
कधी वापरावे न डोके स्वतःचे

कुठे मूर्ख यासारखा सापडावा?
तरी सर्व करतात याचीच वावा!

शशांक जोशी



1 "अकेले अकेले" आणि "प्रिया आज माझी" ह्या चालीवर म्हणता येते हे तथ्य टग्यानामक बुद्धिमान मनोगतीकडून समजले. आधी हा ऋणनिर्देश करायचा राहून गेला होता त्याबद्दल क्षमस्व.
2 मॅनेजर लोकांचा वेळ जात नाही म्हणून ते "मिटिंग मिटिंग" खेळतात.


This was first published on www.manogat.com and can be seen here.

Get the PDF file of this article.

.

6 Comments:

At 7:22 AM, Anonymous Anonymous said...

सही रे पठ्ठ्या!
तुला दहावीत मराठीत नक्कीच चांगले मार्कं असतील. विचार का? कारण या कचेरी श्लोकांत लघु-गुरूंची भट्टी बाकी बरोब्बर जमलीये! :-)
तुझ्या आणखीन कविता वाचायला आवडतील! भा.रा.तांबे गेल्यापासून कोणी वृत्तांत म्हणून कविता लिहीतच नाही. तुझ्याकडून अपेक्षा आहेत.. ;-)

 
At 7:22 AM, Anonymous Anonymous said...

सही रे पठ्ठ्या!
तुला दहावीत मराठीत नक्कीच चांगले मार्कं असतील. विचार का? कारण या कचेरी श्लोकांत लघु-गुरूंची भट्टी बाकी बरोब्बर जमलीये! :-)
तुझ्या आणखीन कविता वाचायला आवडतील! भा.रा.तांबे गेल्यापासून कोणी वृत्तांत म्हणून कविता लिहीतच नाही. तुझ्याकडून अपेक्षा आहेत.. ;-)

 
At 7:57 PM, Blogger Akira said...

Kavita Aawadali. Punyawarchi kavita hi chaan hoti...

 
At 1:25 PM, Blogger shashank said...

आशिष आणि अकिरा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

शशांक

 
At 12:26 PM, Anonymous Anonymous said...

(चाल : "मनाचे श्लोक", "अकेले अकेले कहां जा रहे हो" किंवा "प्रिया आज माझी नसे साथ द्याया")

लेका शशांका, माझी आयडिया ढापतोस काय रे? ;-)

 
At 4:34 PM, Blogger shashank said...

चूक झाली, क्षमा असावी.
दुरुस्त केली आहे!

 

Post a Comment

<< Home