Thursday, September 28, 2006

काहीच्या काही कविता - पिवळाई

१.
कसला गोंधळ सुरू आहे
म्हणून पाहायला गेलो तर कळले
ट्रॅफिकचा लोच्या झालाय!
म्युनिसिपालटिने सिग्नलला
फक्त पिवळेच दिवे बसवलेत!

२.
हल्लीच्या डॉक्टरांवरचा
माझा विश्वासच उडालाय
आपल्याला कावीळ होते तेंव्हा
जग खरंच पिवळं असतं म्हणे!

३.
कावीळच असावी बहुतेक
सारे कसे पिवळे पिवळे दिसतेय
दवाखान्यात नेताना मात्र
अचानक म्हणाला
सारे कसे हिरवे हिरवे दिसतेय
मी रिक्षावाल्याला म्हटले,
"वेड्यांच्या इस्पितळाकडे घ्या"

४.
पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या
त्या काळसर तरूणीने
रस्त्यावरून जाताना,
हलकेच मागे वळून
आपले पिवळे दात दाखवले
माझ्या हातात होता
विको वज्रदंतीचा पिवळा डबा!

५.
चाल : पहिला पाऊस पहिली आठवण - सौमित्र

पिवळे टेबल, पिवळे स्टूल
पिवळ्या वेलीवर, पिवळे फूल
पिवळे घर, पिवळे दार
पिवळ्या फोटोला, पिवळा हार ...
पिवळे स्वप्न, पिवळा भास
पिवळ्या केळ्याला, पिवळा वास
पिवळे कुत्रे, पिवळी गाय
पिवळ्या मांजराचे पिवळे पाय
पिवळी जमीन पिवळे आकाश
पिवळ्या दिव्याचा पिवळा प्रकाश
पिवळा रेडिओ, पिवळी गाणी
पिवळ्या नळाला, पिवळे पाणी
पिवळी झोप, पिवळी जाग
पिवळे प्रेम, पिवळा राग
पिवळी गंमत, पिवळा खेळ
पिवळ्या सकाळची पिवळी वेळ
पिवळा कागद पिवळी वही
पिवळ्या पेनाची पिवळी सही
पिवळी कविता पिवळ्या उपमा
पिवळ्या कवीचा पिवळा चष्मा

- शशांक जोशी

This article was first published on www.manogat.com and can be seen here
Get the PDF file of this article.

13 Comments:

At 1:58 PM, Anonymous Anonymous said...

hahahahah!!!!!! Just amazing

 
At 9:42 AM, Blogger Vishal K said...

हा हा हा !!!सही

 
At 8:55 AM, Anonymous Anonymous said...

Fantastic.... छानच कविता!! अशोक नायगावकरी टाईप... बऱ्याच दिवसांनी एवढा पिवळा हसलो.

 
At 10:37 AM, Blogger shashank said...

वसूद, विशाल आणि सचिन,
प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
शशांक

 
At 3:28 AM, Anonymous Anonymous said...

वाह!

काळीज पिवळटून टाकणार्‍या रचना!

तो

 
At 1:45 PM, Blogger Unknown said...

dhanyavaad shashank vachalyabaddal... ani tumacha blog jari band asla tari june posts parat parat vachnyasarkhi astat ! neways tumhi manogat varche ch shashank na? thanks for ur comment...(ani mi ajunahi diwasbhar kahi karat nahi other thn mentioned in the
blog..... :D )

 
At 3:21 AM, Blogger TheKing said...

Pivale post, pivalee comment
Pivla blogger, pivlaa reader!

Hope to see other colors soon on this blog.

 
At 9:08 AM, Blogger प्रा.डॉ.दिलीप बिरुटे said...

शशांकराव.
पिवळ्या कवीचा पिवळा चष्मा.अन इशारे मस्त कविता आपल्याला आवडली.आणि झकास लिहिता राव तुम्ही.साहित्यविषयक लेख ही आवडला.

प्रा.डॊ.दिलीप बिरुटे.

 
At 1:30 AM, Anonymous Anonymous said...

wa wa wa....tumchi kavita wachun dole piwle padle...tari krupaya parat rangancha asa apaman karu naye hi vinanti...

 
At 10:14 PM, Blogger AbhiC said...

Bhannat..kharrch kahichya kahi aahe kavita...pan avadlya[:)]

 
At 11:16 PM, Blogger Rahul Raut said...

Sahi Hai Bhidu!!
Keep Writing!!!

 
At 6:08 AM, Blogger shashank said...

धन्यवाद मंडळी! :)

 
At 11:45 PM, Blogger cutehobit said...

प्रिय ब्लोगर ,
तुझा मराठी ब्लोग वाचुन खुप छान वाटलं..
खुप उत्तम प्रतीच लिखण तु तुझ्या ब्लोग मध्ये केलं आहेस..
परंतू हे लिखाण जस्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणही महत्वाच आहे..
त्याबद्दल मी थोड माझ्या ब्लोग मध्ये लिहिल आहे..
त्याची तुला नक्कीच मदत होइल..
चल..पुन्हा भेटुच ब्लोग मधून..
मझ्या ब्लोग वर नक्की ये..
http://pune-marathi-blog.blogspot.com/

 

Post a Comment

<< Home